आचरा, दि.१९ मार्च (अर्जुन बापर्डेकर)
कालावल खाडीपात्रात अवैधरित्या मोठया प्रमाणात वाळू उपसा होत आहे वाळू उपशा विरोधात स्थानिकांच्या तक्रारी महसूल प्रशासनाकडे दिवसेंदिवस वाढत आहेत.सोमवारी महसूल पथकाने धडक कारवाई करत वायंगणी हुरासवाडी व सडयेवाडी येथील अनधिकृत वाळूउपसा रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले
काही दिवसापूर्वी तळाशील ग्रामस्थांनीही तळशीलात आलेल्या जिल्हाधिकारी यांच्याकडे वाळू उपशा बाबत आवाज उठवला होता यावेळी खाडीतील अवैद्य वाळूउपसावर पथक नेमून कारवाई करणार असल्याचे आश्वस्थ केले होते. सोमवारी महसूलचे आचरा मंडल अधिकारी अजय परब, आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, सहा पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई, हवालदार मिलिंद परब तलाठी शेजवळ,जाधव,पोलीस पाटील सुनील त्रिंबककर यांच्या पथकाने वायंगणी हुरासवाडी व सडयेवाडी येथील अनधिकृत वाळूउपसा रॅम्प तोडत ही धडक कारवाई केली