मालवण,दि.१८ मार्च
मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित मालवण प्रीमियर लीग २०२४ पर्व ७ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन दि. १७ मार्च रोजी ज्येष्ठ क्रीडापटू श्री. जयंत गवंडे यांच्या हस्ते मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे करण्यात आले. हि स्पर्धा दि. १७ मार्च ते दि. २४ मार्च या कालावधीत मालवण बोर्डिंग मैदान येथे संपन्न होणार आहे.
मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून तरुण पिढीमधून आय. पी. एल. दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याचा प्रयत्न केल जात आहे. त्याच अनुषंगाने गेली सात वर्षे मालवण स्पोर्ट्स क्लबतर्फे मालवण प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रक्कम ५५,५५५/- व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला रोख रक्कम ३३,३३३/- व आकर्षक चषक तसेच अष्टपैलू खेळाडू, अष्टपैलू गोलंदाज, अष्टपैलू फलंदाज देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सामन्याचे नाणे फेक मालवण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आली. मालवण प्रीमिअर लीगच्या उदघाटन प्रसंगी जयंत गवंडे, सौरभ ताम्हणकर यांच्यासह क्लबचे उपाध्यक्ष गौरव लुडबे, नितीन कानसे, फ्रँसिस फेर्नांडिस, सुशील शेडगे, ज्ञानेश केळूसकर, नितीन वाळके, संदीप पेडणेकर, जुबेर खान, अनिल चव्हाण, राहुल परुळेकर, लौकिक कांदळकर, रुपेश केळूसकर, वैभव सावंत, अण्णा कारेकर, लारा मयेकर, रोहित चव्हाण, प्रथमेश लुडबे, मालवण स्पोर्ट्स क्लबचे सदस्य तसेच खेळाडू आदी उपस्थित होते.