सावंतवाडी दि.१८ मार्च
दोडामार्ग तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत खडपडे कुंभवडे परिसरात नुकतेच पट्टेरी वाघाचे दर्शन घडले. या पार्श्वभूमीवर उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा पट्टेरी वाघ आहेत. तसे सर्वेक्षणात अस्तित्व आढळून आले आहे.
दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे परिसरात रस्ता भूमिपूजन यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस जात असताना खडपडे येथील रस्त्यालगत असलेल्या जंगलामध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन घडले. ते त्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. यानंतर सोशल मीडियावर व्हायलर केले. त्यामुळे परिसरातील नागरिक घाबरून गेले आहेत.
आंबोली ते तिलारी – मांगेली सह्याद्री पट्टा व्याघ्र काॅरिडाॅर म्हणून जाहीर करण्यात यावा म्हणून वनशक्ती संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पट्ट्यात काही भागात खनिज प्रकल्प प्रस्तावित आहेत.मात्र वन खात्याने वाघांचा वावराबाबत स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. हल्लीच चौकुळ परिसरात गवा रेडा वर हल्ला करणारा पट्टेरी वाघ देखील कॅमेऱ्यात कैद झाला होता.
या पार्श्वभूमीवर उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, गवा रेडा व सांबर हे वाघांचे भक्ष्य आहे. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे पट्टेरी वाघाचे अस्तित्व देखील आहेत. जिल्ह्यात सध्या सहा पट्टेरी वाघ आहेत. त्यांचा वावर एकाच ठिकाणी नसतो. वन विभागाने सर्वेक्षण केले तेव्हा त्याचे अस्तित्व आढळून आले आहेत. कर्नाटक दांडेली,गोवा म्हादयी आणि सह्याद्री पट्टा आहे. या परिसरात वाघांचा वावर आहे.
तसेच दोडामार्ग तालुक्यातील केर भागात हत्तीचे कुटुंब आहे. या चार सदस्यात टस्कर हत्ती,हत्तीण, दोन पील्ले आहेत. याशिवाय विपुल प्रमाणात वन्य प्राणी आणि जैवविविधता आहे.
Home आपलं सिंधुदुर्ग दोडामार्ग तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत खडपडे कुंभवडे परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन घडले