सिंधुदुर्गनगरी,दि.१८ मार्च
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने खाजगी व्यक्तींच्या जागेवर/ सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास सिंधुदुर्ग जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार निर्बंध आदेश जारी केला आहे.
निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहीणे, इत्यादी करीता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधित मालकाची परवानगी शिवाय व संबंधित परवाना प्राधिकरणाचे परवानगी शिवाय वापर करण्याण्यास निवडणुक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दि.6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहेत.