रहदारीस अडथळा होईल अपघात होईल असे निवडणुकीचे साहित्य लावण्यास निर्बंध – जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे

 सिंधुदुर्गनगरी,दि.१८ मार्च

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने सार्वजनिक ईमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रत्यावर, रहदारीस अडथळा निर्माण न होवू देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (डीबी) नुसार निर्बंध आदेश जारी केला आहे.

निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. यामुळे जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक ईमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकी संबंधी पोस्टर्स, बैनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होडींग्ज, कमानी लावणे. तसेच निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि.6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घालीत आहे.