सिंधुदुर्गनगरी,दि.१८ मार्च
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने कोणताही सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिर्बंध कार्यद्यांतर्गत कार्यवाहीसाठी सिंधुदुर्ग जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार निर्बंध आदेश जारी केला आहे.
निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. काही व्यक्ती/संस्था यांचेकडून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डीग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीरात लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षाची संबंधीत व्यक्ती/ संस्था यांचेकडून होर्डीग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत निवडणूक आयोगाने मालमत्ता विरुपीत करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचित केल्यानुसार नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात निवडणूकीच्या कालावधीतमध्ये होर्डीग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीरात प्रदर्शीत करतांना संबंधित स्थानिक प्राधिकरण्याची पुर्वपरवानगी घेणे बंधनकारण आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर ते दूर (नष्ट) करुन इमारती, मालमत्ता पुर्ववत करुन घेणे, जाहिरात तात्काळ काढून घेणे आवश्यक आहे. या निवडणूकीच्या कालावधीत शासकीय/निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विरुपता करण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत दि. 6 जून 2024 पर्यंत निर्बंध घातले आहेत.