श्रीमद जगतगुरु शंकराचार्य संस्थानमठ, संकेश्वर-करवीर श्री. प. पू. सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंहभारती स्वामीजी संकेश्वर यांच्या हस्ते होणार
मालवण,दि.१८ मार्च
कट्टा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरातील मूर्ती पुनः प्राणप्रतिष्ठापना तसेच राजस्थान येथून आणण्यात – आलेल्या गणपती, लक्ष्मी-नारायण यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिरावर बसविण्यात येणाऱ्या मंगल कलशारोहण सोहळ्याचा प्रारंभ काल भव्य मिरवणूकीने झाल्यानंतर आज मंदिरात विठ्ठल रखुमाईच्या नामघोषात विविध धार्मिक विधी संपन्न झाले. उद्या दि. १९ मार्च रोजी सकाळी ११ ‘शिखर कलश स्थापन’ श्रीमद जगतगुरु शंकराचार्य संस्थानमठ, संकेश्वर-करवीर श्री. प. पू. सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंहभारती स्वामीजी संकेश्वर यांच्या हस्ते होणार आहे
कट्टा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरातील मूर्ती पुनः प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्यास कालपासून उत्साहात सुरुवात झाली. काल कट्टा बाजारपेठेतून सवाद्य मिरवणूक कट्टा बाजारपेठ येथून काढण्यात आली. या मिरवणुकीला संपूर्ण कट्टा पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज सोमवारी मंदिरात सकाळी साडे सात वाजल्यापासून दुपारपर्यंत प्रायश्चित, ‘पुण्याहवाचन’, ‘आचार्य वरण’, ‘स्थलशुद्धी’, मंडल देवता स्थापना, ‘जलाधिवास’ शांतिहोम आदी विविध धार्मिक विधी संपन्न झाले. या विधीचे यजमानपद दिनकर गुराम व सौ. दमयंती दिनकर गुराम यांनी भूषविले. तर हे सर्व विधी वा्यंगणी येथील पुरोहित श्री. मुरवणे यांच्या पौरोहित्याखाली आणि सचिन भाटिवडेकर (आवळेगाव) व इतर ब्राह्मण वृंद यांच्या सहकार्याने हे विधी संपन्न झाले. तर सायंकाळी स्थानिक महिलांची भजने व रात्री श्री. संजय दळवी, तळगाव यांची अभंगवाणी आणि श्री. शहाजान शेख, सावंतवाडी यांचे भजन तसेच स्थानिक भजने आदी कार्यक्रम संपन्न झाले.
या सोहळ्यात मंगळवार, दि. १९ मार्च रोजी सकाळी ७.३० ते दु. ०१.३० स्थलशुद्धी, ‘मंडलदेवता पूजन’, अग्नि स्थापना’, वास्तुहोम, ‘ग्रहयज्ञ’ पर्याय होम ‘शिखरकलश हवन’, सकाळी ११ ते ११.३३ वा. ‘शिखर कलश स्थापन’ श्रीमद जगतगुरु शंकराचार्य संस्थानमठ, संकेश्वर-करवीर श्री. प. पू. सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंहभारती स्वामीजी संकेश्वर यांच्या हस्ते होणार आहे. संध्या ५ ते ६.३० वा. स्थानिक महिला- अभंगवाणी, रात्री ७ ते १० वा. विश्वविख्यात भरत नाट्य नृत्य आचार्य पार्वती कुमार कांबळी यांच्या शिष्या डॉ. सुचिता भिडे चाफेकर यांचा भरत नाट्य कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि. २० मार्च सकाळी ७.३० ते १.३० पर्यंत स्थलशुद्धी “मंहलंदेवता पूजन’, ‘तत्वन्यास होम’ मुख्य देवता प्रतिष्ठापना ‘तत्वन्यास व प्रतिष्ठापना’, ‘महापूजा’ बलिदान, पूर्णाहुती, नैवेद्य, आरती, सामूहिक गाऱ्हाणे, संध्या ५ ते ७ वा. स्थानिक महिला धार्मिक नृत्य, रात्री ७.३० ते ११ वा. जिल्ह्यातील नामांकित भजनी बुवा यांची “संगीत भजन संस्थां” “सुश्राव्य भजने”, गुरुवार, दि. २१ मार्च रोजी सकाळी ०९.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. महाआरती, दुपारी १.३० वा ते ३ वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद, संध्या ६ वा. श्री देव रवळनाथ प्रसादिक भजन, फोंडा (बुवा साहिल पारकर यांचे भजन), रात्री ९ वा. श्री. वालावलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.