अपरान्त साहित्य, कला प्रबोधिनी’च्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी प्रफुल्ल जाधव, सरचिटणीसपदी चेतन बोडेकर

वैभववाडी, दि.१५ जानेवारी
अपरान्त साहित्य, कला प्रबोधिनी’च्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी प्रफुल्ल जाधव, सरचिटणीसपदी चेतन बोडेकर, कार्याध्यक्षपदी जयवंत मोरे तर हिशोब तपासणीस पदी मयुरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली.
संस्थेच्या सदस्यांची नुकतीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे सभा संपन्न झाली. यावेळी ‘अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी वैभववाडी शाखेची संपूर्ण कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष प्रफुल्ल जाधव,उपाध्यक्ष – संजय जंगम, कृष्णा कांबळे
कार्याध्यक्ष जयवंत मोरे,सरचिटणीस चेतन बोडेकर,सहचिटणीस सचिन कांबळे,
भीमराव कांबळे,कोषाध्यक्ष प्रशांत कदम,
राजेश कळसुलकर
हि. तपासणीस – मयुरी पेडणेकर
संघटक किरण पेडणेकर,  रुपेश कांबळे
सल्लागार विकास मुणगेकर
सुभाष कांबळे
रविंद्र पवार
शरद कांबळे
मारुती कांबळे
कार्यकारिणी सदस्य
नितीन कांबळे
प्रशिका कदम
दरम्यान, संस्थेच्या वतीने दि. 27 व 28 जानेवारी 2024 रोजी कणकवली येथे दुसरी संगितीचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी जाहीर केले आहे.