जानवली येथे दामू सावंत मित्रमंडळ आयोजित २० मार्चला बैलगाडी शर्यत स्पर्धा

केंद्रीय मंत्री नारायण राणे,ना.दीपक केसरकर,आ.नितेश राणे यांची उपस्थिती

कणकवली दि .१९ मार्च(भगवान लोके)

दामू सावंत मित्रमंडळ जानवली यांच्या वतीने राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय
बैलगाडी शर्यत २० मार्च २०२४ रोजी दुपारी ३ वाजता जानवली वायंगवडे, हॉटेल निलम्स कंट्रीसाईडच्यामागे होणार आहे.या स्पर्धेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय मंत्री दीपक केसरकर, आ. नितेश राणे यांची उपस्थिती राहणार आहे.या स्पर्धेस सर्वांनी उपस्थित राहावे,असे आवाहन सुशिल सावंत, वेदांत सोहनी , दामू सावंत , दिपक दळवी , कुशल राणे यांनी केले.