सुधांशू सोमण याला मुंबई विद्यापीठाच्या संघातून राज्यस्तरीय आंतर विद्यापीठीय युवा महोत्सवात “Golden Boy” म्हणून गौरव

देवगड,दि.२० मार्च

श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार सुधांशू समीर सोमण याला मुंबई विद्यापीठाच्या संघातून राज्यस्तरीय आंतर विद्यापीठीय युवा महोत्सवात “Golden Boy” म्हणून गौरवण्यात आले आणि त्याची निवड राष्ट्रीय स्तरावर होणार्‍या युवा महोत्सवासाठी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर याठिकाणी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय आंतर विद्यापीठीय युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाच्या संघातून कुमार सुधांशू समीर सोमण याला विविध कला प्रकारात पुढीलप्रमाणे यश प्राप्त झाले आहे.

1. शास्त्रीय संगीत (वैयक्तिक) 1st

2. नाट्यसंगीत (वैयक्तिक) 2nd

3. Light vocal (वैयक्तिक) 1st

4. भारतीय समूह गायन 3rd

5. पाश्चिमात्य समूह गायन 2nd

6. Folk orchestra 2nd

या राज्यस्तरीय आंतर विद्यापीठीय युवा महोत्सवात उत्कृष्ट यश प्राप्त केल्याबद्दल कुमार सुधांशू समीर सोमण याचे शिक्षण विकास मंडळ संस्था पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सांस्कृतिक विभाग, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन