सावंतवाडी, दि.२० मार्च
माजगाव उद्यमनगर येथे असलेल्या वीज
महावितरणच्या उपकेंद्र परिसरात शॉर्टसर्कीट मुळे आगीचा भडका उडाला. ही घटना आज बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. दुपारची वेळ असल्याकारणाने लगेच आजूबाजूच्या परिसरात आग पसरली. यावेळी तेथील जागरूक ग्रामस्थांनी सावंतवाडी नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाला पाचारण केले त्यानंतर बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. त्यामुळे फार मोठे नुकसान टळले.