आरोग्यविषयक मार्गदर्शन संपन्न

वेंगुर्ला,दि.२० मार्च

होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजतर्फे अणसूर पाल हायस्कूलमध्ये वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता, कुमारवयीन मुलींसाठी समतोल आहार व एम.एच.एम.विषयक मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.

डॉ.श्रीराम हिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनींशी सुसंवाद साधला. यावेळी शिक्षिका अक्षता पेडणेकर, चारूता परब व अन्य उपस्थित होते. या सत्राबद्दल मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनी आभार मानले.