सासोली येथील सामाहिक जमीनीत बलाढ्य कंपनीकडून झालेली वृक्षतोड जंगलात रस्ते नैसर्गिक पाणथळ बुजवणे यासाठी ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करणार — दयानंद स्टॅलिन

दोडामार्ग, दि. २० मार्च 

सासोली ग्रामस्थांनी आपल्या सामाईक जमीनी खातेफोड केली नाही. विक्री केली नाही. असे असताना एक बलाढ्य कंपनी शेकडो एकर जमिनीमध्ये घुसखोरी करून वृक्षतोड, रस्ते, काढून, उत्खनन करून नैसर्गिक पाणथळ नष्ट करणे वन्य प्राणी यांचा आसरा हिरावून घेत आहेत. या बाबत महसूल विभाग वन विभाग कडे लेखी तक्रार उपोषण करून देखील दखल घेतली जात नाही. बलाढ्य कंपनीला पाठीशी घातले जात आहे. या पार्श्वभूमीवर सासोली गावातील ग्रामस्थ यांची वनशक्ती फाउंडेशन चे दयानंद स्टॅलिन यांनी भेट घेऊन सासोली गावातील ग्रामस्थ यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी सासोली गावातील ग्रामस्थ यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले.