दांडेकर देवस्थानचा वर्धापनदिन २३ रोजी

वेंगुर्ला,दि. २१ मार्च

वेंगुर्ला-कुबलवाडा येथील जुने दत्तमंदिर नजिकच्या श्रीदेव दांडेकर देवस्थानचा ७वा वर्धापनदिन शनिवार दि.२३ मार्च रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम व सायं.७ वा.वावळेश्वर दशावतार मंडळ, तेंडोली यांचे नाटक होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.