ग्रामसेविका शोभा सावंत यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्या-

मळगाव ग्रामस्थ पांडुरंग राऊळ यांच्यासह ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या जवळ

सावंतवाडी,दि.१५ जानेवारी 
मळगाव ग्रामपंचायत ची विद्यमान सर्व ग्रामपंचायत सदस्यांना निलंबित करत बाॅडी बरखास्त करा तसेच ग्रामसेविका शोभा सावंत यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्या अशी मागणी मळगाव ग्रामस्थ पांडुरंग राऊळ यांच्यासह ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या जवळ केली. त्यांना यावेळी कारवाई चे आश्वासन दिले आहे.

दरम्यान ग्रामपंचायत बॉडी बरकास्त न झाल्यास प्रसंगी आंदोलनाची भूमिकाही हाती घेऊ असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.

श्री राऊळ यांच्यासह ग्रामस्थांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते त्यांच्यासोबत माजी सरपंच गणेशप्रसाद फळ पेडणेकर,गजानन सातार्डेकर, गुरुनाथ गावकर महेश शिरोडकर पांडुरंग नाटेकर निखिल राऊळ सहदेव राऊळ आधी ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री राऊळ म्हणाले पंधरावा वित्त आयोगाचा निधी खर्च न केल्याप्रकरणीचा ठपका ठेवून ग्रामसेविका शोभा राऊळ यांचे केलेले निलंबन चुकीचे असून ग्रामस्थ म्हणून आमचा पूर्ण पाठिंबा आहे केवळ सहा महिन्यापूर्वी त्या ग्रामसेविका म्हणून महागाव ग्रामपंचायत मध्ये रुजू झाल्या होत्या त्यामुळे १५ वा वित्त आयोगाचा निधी एवढ्या कमी वेळात त्या कशा काय खर्च करू शकतात एकीकडे नियमित ग्रामसेवक नसल्यामुळे आधीच पंधरा वित्त आयोगाची कामे रेंगाळलेली होती तर दुसरीकडे निधी खर्च घालण्यासाठी आवश्यक असलेल्या ठरावाला ग्रामपंचायत बॉडीचं सहकार्य नसल्यामुळे निधी खर्च पडू शकला नाही त्यामुळे याला ग्रामसेविकेला जबाबदार धरून त्याचे निलंबन करणे तिचे असून याला ग्रामपंचायत बॉडी ही तितकीच जबाबदार आहे त्यामुळे ग्रामसेविकेची झालेली निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी आम्ही केली आहे
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नायर यांनीही सकारात्मकता दाखवली आहे.
ते पुढे म्हणाले ग्रामपंचाय कारभारामध्ये मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात अपहार आहे संदर्भात सर्व माहिती आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे एकीकडे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतानाही आवश्यक असलेली ग्रामसेविकेची सही नसताना कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यामध्ये आर्थिक साठेलोटे आहेत. तर कर्मचाऱ्यांना पगार देता नाही ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचाही विचार केलेला नाही एकूणच या सगळ्या गोष्टी मागे पूर्ण ग्रामपंचायतची बॉडी कारणीभूत असल्याने ती बरखास्त करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे आमची मागणी वेळीच मान्य न झाल्यास प्रसंगी यासाठी आम्ही आंदोलनात्मक पवित्रही हाती घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले