देवगड, दि.२१ मार्च
कुणकेश्वर खालचीवाडी येथील रहिवासी गं.भा. रत्नप्रभा महादेव धुवाळी (९०)यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने गुरुवारी पहाटे ५ वा दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे ,चार विवाहित मुली ,सुना, जावई ,नातवंडे असा परिवार असून कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी यांच्या मातोश्री होत.