सावंतवाडी,दि.२२ मार्च
जागतिक वन दिवसाचे औचित्य साधत सावंतवाडी येथील निसर्ग प्रेमी म्हणून ओळखला जाणारा कु. कबीर हेरेकर यांने मागच्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील बियाणे गोळा करून त्यांना जंगलात जाऊन पेरण्याचे याजिले आहे. बियाणे पर्यावरण प्रेमींनी जमा करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी त्याने आपल्याला बिये आणून देण्याचे सर्वांना आवाहन केले आहे. मागच्या वर्षी कबीर ने एकूण २५७ बियाणे पेरले होते मात्र ह्या वर्षी ही संख्या अधिक वाढली पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. त्याच्या या निसर्ग व पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमात सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.बियांची पेरणी येत्या २८ जुलै ला करणार आहोत. २८ जुलै हा जागतीक निसर्ग संवर्धन दिवस ( World Nature Conservation day ) म्हणून साजरा केला जातो. त्या पुर्वी आणून द्यावे, असे आवाहन केले आहे.


