शाळा क्र.९ च्या इमारत एक निर्लेखित साठी निधी उपलब्ध करून मिळाला नाही तर २६ जानेवारी रोजी उपोषणाला बसणार-माजी सरपंच सौ पुजापेडणेकर

सावंतवाडी,दि.१५ जानेवारी
इन्सुली येथील जि.प.प्रा. शाळा क्र.९ च्या इमारत एक निर्लेखित साठी निधी उपलब्ध करून मिळाला नाही तर येत्या २६ जानेवारी रोजी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा माजी सरपंच सौ पुजा दत्ताराम पेडणेकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.

जि. प. प्रा. शाळा इन्सुली न.९ च्चा इमारत एक निर्लेखन झाले असून सदर आगा सपाट करण्यात आली आहे. इन्सुली नं.९ मध्ये १ ते ५ चर्ग असून एका वर्गात अध्यापन करताना अनेक समस्या निर्माण होतात तरी सदर इमारतीस लवकरात लवकर निधी मंजूर व्हावा सदर निधी लवकर न मंजूर झाल्यास नाईलाजास्तव २६ जानेवारी रोजी आम्ही ग्रामस्थ उपोषणास बसू असा इशारा देण्यात आला आहे.
इन्सुली माजी सरपंच सौ पूजा पेडणेकर, यांच्यासह अध्यक्ष चंद्रकांत शेटे प्रकाश शेटे गुरुनाथ शेटे आनंद राणे तपसी मोरजकर व अन्य मान्यवरांनी यासाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.