पणदूर येथे संपन्न झालेल्या ५१व्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये कु. तनिश बिडये, याने माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला

देवगड,दि.१५ जानेवारी
पणदूर येथे संपन्न झालेल्या ५१व्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये श्रीम. न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड मधील ११वी विज्ञान (अ) या वर्गातील विद्यार्थी कु. तनिश प्रशांत बिडये, याने माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला असून त्याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

यापूर्वी पडेल हायस्कूल येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. तनिश याने “ओझोन निर्जंतुकीकरण” हे मॉडेल बनविले आहे. या मॉडेलचा वैद्यकीय क्षेत्रामध्ये महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो. या मॉडेल साठी त्याला प्रा. मनोहर तेली आणि प्रा. भारत तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. तनिश याच्या या यशाबद्दल शिक्षण विकास मंडळ देवगड संस्थेचे पदाधिकारी, देवगड कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.