कामचुकार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करताच जिल्हा ग्रामसेवक संघटना खडबडून जागी

जि प भावना समोर धरणे आंदोलन करीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्दम यांनी आंदोलनाचा इशारा

सिंधुदुर्ग,दि.१५ जानेवारी

ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या निधी मुदतीत खर्च केला नसल्याच्या कारणास्तव सिंधुदुर्ग जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी अशा कामचुकार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करताच जिल्हा ग्रामसेवक संघटना खडबडून जागी झाली आहे, ग्रामसेवकांचे निलंबन एकतर्फे असल्याचा आरोप करत काही कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. व सोमवारी जि प भावना समोर धरणे आंदोलन करीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्दम यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १५ वा वित्त आयोगाच्या कमी खर्चामुळे सहा ग्रामसेवकांचे निलंबन झाले आहे. ग्राम विकासाचा हा निधी अनेक वर्षे ग्रामसेवकांच्या कामचुकार मुळे पणामुळे खर्च झाला नाही ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने ही कारवाई झाली. मात्र ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप करत या निलंबन प्रक्रिया आणि इतर कारवाई विरोधात आज सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हा परिषद समोर लाक्षणिक धरणे आंदोलन छेडण्यात आले. सरचिटणीस संतोष पालव कार्याध्यक्ष प्रसाद ठाकूर उपाध्यक्ष संदीप गवस श्रीमती रेश्मा गोवळकर, कोषाध्यक्ष सुनील प्रभू देसाई, सहसचिव प्रवीण नेमण जिल्हा संघटक उज्वल झरकर सुजाता जगताप आधी पदाधिकारी ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१५ वा वित्त आयोगा निधी अखर्चित ठेवणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी नुकतीच निलंबनाची कारवाई केली आहेत. मात्र ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप ग्रामसेवक संघटनेने केला आहे. याविरोधात संघटनेने असहकार आंदोलनही छेडले आहे. शिवाय अन्य कारवाई विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्दम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद भवनासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामसेवक उपस्थित होते. तसेच जो पर्यंत निलंबन आदेश मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत बेमुदत असहकार आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

असे आहे आंदोलनाचे स्वरूप

ग्रामसेवक निलंबन पार्श्वभूमीवर ग्रामसेवक संघटनेने १५ जानेवारी पासून प्रशासनाच्या कोणत्याही सभेला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही प्रशिक्षणाला हजर राहणार नाहीत. अहवाल सादर केला जाणार नाही. ग्रामपंचायत काम वगळता अन्य कोणत्याही उपक्रमात सहभाग घेणार नाहीत. जिल्हा परिषद कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम बहिष्कार घातला आहे.