आंबेरी चेकपोस्टवर जिलेटीन कांड्या जप्त

देवगड,दि.२४ मार्च

आंबेरी चेकपोस्ट वर शुक्रवारी सायंकाळीं 7 वा. सुमारास लोकसभा निवडणुकी साठी स्थायी सर्वेक्षण पथक यांनी रत्नगिरी कडून देवगडचा दिशेने येणारी एक्स युव्ही 500 गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये 34 हजार किमतीचा 2000 हजार जिलेटीन चा कांड्या आणि 13 हजार रुपये किमतीचे डीटोनेटर जप्त केले असून गाडी सहित 7लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी मुकेशकुमार लालूराम पवार आणि त्याचा सहकारी देवेंद्र सिंह रमनलाल राठोड मूळ रा राजस्थान सध्या रा पाटगाव देवरूख या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर बातमी आशिकी 22 मार्च रोजी 19.45 वा मानाने देवेंद्रसिंग रतनलाल राठोड वय 26 वर्ष राहणार भोपालगड भिलवडा (राजस्थान) व ड्रायव्हर मुकेशकुमार लालूराम पंवार रा.भिलवडा राजस्थान हे त्यांचे XUV 500 आरटीओ नंबर RJ- 06 UD 0377 या चारचाकी गाडीमध्ये तुळसणी तालुका संगमेश्वर (देवरुख) जिल्हा रत्नागिरी येथून त्याच्या वडिलांच्या मालकीच्या चार भुजा इंटरप्राईजेस या स्फोटक पदार्थाच्या गोडाऊन मधून 2000 जलेटीनच्या जिवंत कांड्या (super- 90) explosive किंमत 34,000/- व 1000 डेटोनेटर किंमत 11,000/- रुपये असे एकूण 45,000/- रुपयांच्या स्फोटक पदार्थ blasting ट्रॅक्टर ला देण्यासाठी देवगड ला जात असताना बेकायदेशीर विनापरवाना वाहतूक करताना मिळून आल्याने स्फोटक पदार्थ अधिनियम प्रमाणे कारवाई केली आहे.