सावंतवाडी,दि.२५ मार्च
मालवणी मुलखातील लोकजीवन व लोकसंस्कृती मालवणी भाषेत शब्दबध्द करत खेड्यातील माणूस नोकरी धंदा व शिक्षणासाठी शहरात जाताना आपल्या खेडेगावातील आठवणी स्मरून किती भावूक आयुष्य जगतो त्यांचे अंतर्मुख करणारे दर्शन प्रा. डॉ. नामदेव गवळी यांच्या कवितेतून होते असं प्रतिपादन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे या गवळी यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार प्रसंगी केले.
अलीकडेच नवी दिल्ली येथील १९० सत्रात सहा दिवस चाललेल्या व गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या विश्व बोलीभाषा संमेलनात मालवणी भाषेत कविता सादर केल्या नंतर जनसेवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग तर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत व लोकमान्य बॅक संचालक तसेच बेळगांव नगरपालिका माजी विरोधी पक्षनेते पंढरी परब यांच्या हस्ते प्राध्यापक डॉ. नामदेव गवळी यांचा जनसेवा मालवणी कवी पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गवळी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी मा.नामदेव गवळी यांनी आपला भातालय हा कवितासंग्रह डॉ.संजीव लिंगवत यांना सादर केला, त्यातील यांच्या याच कविता संग्रहातील काही निवडक मालवणी कविता डॉ . लिंगवत यांनी सादर केल्या. यावेळी पंढरी परब, सामाजिक कार्यकर्ते भानुदास पास्ते, अहमदनगर पतपेढीचे संचालक धोंडी राऊळ, किर्तनकार प्रकाश केळुसकर, निवृत्त सैनिक अनंत परब, सुप्रसिद्ध दशावतारी कलावंत मयुर गवळी, स्वंयंपुर्ण शेतकरी वसंत मोरजकर, जनसेवा प्रतिष्ठान सचिव डॉ.सई लिंगवत , सौ. उषा गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. संजीव लिंगवत यांनी तर आभार प्रदर्शन मयूर गवळी यांनी केले.
Home आपलं सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे या गवळीगवळी यांच्या निवासस्थानी डॉ. नामदेव गवळी यांचा सत्कार