देवगड,दि .१५ जानेवारी
जिम स्विम ॲकॅड-मी, कोल्हापूर यांच्या वतीने श्रीदुर्गामाता कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पाच किलोमीटर जलतरण स्पर्धेत १८-३५ वयोगटामध्ये मुलांमध्ये करण मिल्के आणि मुलींमध्ये तनया मिल्के, रत्नागिरी यांनी प्रथम विजेतेपद पटकावले.
५०० मीटर, १ किलोमीटर, २ किलोमीटर, ३ किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा पाच गटांत ही स्पर्धा विजयदुर्ग खाडीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील १६० स्पर्धकांनी सहभाग घेतला. ५ किलोमीटर स्पर्धेमध्ये पुरूष गटामध्ये करण मिल्के, रत्नागिरी प्रथम, सर्वेश गुरव, कोल्हापूर द्वितीय आणि आर्यन घडशी, रत्नागिरी तृतीय विजेता ठरला. मुलींमध्ये तनया मिल्के, रत्नागिरी प्रथम, श्रावणी रणखांब, धाराशीव द्वितीय आणि पायल सागवेकर, विजयदुर्ग तृतीय विजेती ठरली.
७ वर्षाखालील मुलांमध्ये ५०० मीटरच्या स्पर्धेत गणराज जोशी, रत्नागिरी प्रथम आणि गुरूराज पाटील, कोल्हापूर द्वितीय आला. ५०० मीटरच्या या स्पर्धेत मुलींमध्ये दुर्वा चव्हाण, कोल्हापूर प्रथम आणि कनक पोटफोडे, रत्नागिरी द्वितीय आली. ९ वर्षाखालील मुलांमध्ये १ किलोमीटर च्या स्पर्धेत विघ्नेश बर्गे, कोल्हापूर प्रथम, अर्णव पिळणकर, रत्नागिरी द्वितीय आणि स्कंद घाडगे, बेळगाव तृतीय आला. तर मुलींमध्ये पाखी हलगेकर, बेळगाव प्रथम विजेती ठरली. ११ वर्षाखालील १ किलोमीटर च्या स्पर्धेत मुलांमध्ये रूद्र गुप्ता,ठाणे प्रथम, तन्मय चौगुले, कोल्हापूर द्वितीय तर श्लोक पांडव, कोल्हापूर तृतीय आला. तर मुलींमध्ये श्रीनिधी कुमार, ठाणे प्रथम, शरण्या बर्गे, कोल्हापूर द्वितीय आणि ओवी चिंदरकर,ठाणे तृतीय आली.
२ किलोमीटर च्या स्पर्धेत १३ वर्षाखालील मुलांमध्ये वेदांत निसाळे, बेळगाव प्रथम, तनय लाड, ठाणे द्वितीय आणि समृद्ध हलभावी, कोल्हापूर तृतीय आला. तर मुलींमध्ये रेवा परब, ठाणे प्रथम, राजनंदिनी तिवले, कोल्हापूर द्वितीय आणि अहिका हलगेकर,बेळगाव तृतीय आली. २ किलोमीटर च्या या स्पर्धेत ३६-५० वयोगटातील पुरूषांमध्ये अरूण जाधव,बेळगाव प्रथम, पांडुरंग मोरे, धाराशीव द्वितीय आणि नवनाथ राठोड, धाराशीव तृतीय आला. तर महिलांमध्ये गौरी मिल्के,रत्नागिरी प्रथम आणि कविता मोरे,सातारा द्वितीय विजेती ठरली. २ किलोमीटर च्या या जलतरण स्पर्धेत ५१ वर्षावरील पुरुषांमध्ये श्रीमंत गायकवाड, सातारा प्रथम, सचिन मुंज, पुणे द्वितीय आणि राजाराम पानसे, धाराशीव तृतीय आला.
३ किलोमीटर च्या स्पर्धेत १५ वर्षाखालील मुलांमध्ये रूद्र मनाडे,कोल्हापूर प्रथम, अनिष पै,बेळगाव द्वितीय आणि सोहम पाटील, ठाणे तृतीय आला. तर मुलींमध्ये स्नेहा लोकरे,ठाणे प्रथम, श्रेष्ठा रोपटी,बेळगाव द्वितीय आणि अदिती माझी,कोल्हापूर तृतीय आली. १७ वर्षाखालील मुलांमध्ये ३ किलोमीटर च्या स्पर्धेत सोहम मंजुळे,रत्नागिरी प्रथम, अथर्व माझी,कोल्हापूर द्वितीय आणि शिवराज पाटील, कोल्हापूर तृतीय आला.
जिम स्विम ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष अजय पाठक यांच्या नियोजनाखाली झालेल्या या स्पर्धेमध्ये स्पर्धा निरीक्षक म्हणून सुधीर चोरगे यांनी काम पाहिले. तसेच मुख्य पंच म्हणून अर्जुन मुगदुम, गंगाराम बरगे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सतिश कदम आणि स्नेहल कदम यांनी काम पाहिलं. महाराष्ट्र राज्य हौशी संघटनेचे अध्यक्ष आनंद माने यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कैलाश आखाडे, राजेंद्र पालकर, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष किशोर पालकर, दुर्गामाता कलाक्रीडा मंडळाचे अध्यक्ष आनंद देवरुखकर, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, सचिव बाळा कदम तसेच विजयदुर्ग मध्ये चालू असलेल्या “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी” या चित्रपटाचे निर्माते आणि प्राॅडक्शन मॅनेजर तसेच विठ्ठलवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय सावंत, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बिडये, माजी उपसरपंच महेश बिडये उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रहारचे पत्रकार बाळा कदम यांनी केले. तर सूत्रसंचालन किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविकांत राणे, संजना आळवे, शरद डोंगरे, आनंद देवरुखकर, प्रदीप मिठबावकर, प्रकाश लोंबर, केतन घरकर,पंकज जाधव, दिपक करंजे, प्रवासी बोटवाहतुकीचे मालक चालक, विठ्ठलवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय सावंत अशा असंख्य विजयदुर्गवासीयांनी अथक परिश्रम घेतले.