कुडाळ,दि.१५ जानेवारी
कुडाळ येथील शेती बागायतदार चंद्रकांत हरिश्चंद्र काजरेकर यांच्या बागेतील हापुस आंब्याच्या झाडावर आलेले पान ठरले जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान. त्यामुळे चंद्रकांत काजळेकर जागतिक रेकॉर्ड होल्डर ठरले आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड याची नोंद घेतली आहे.
जिल्हा बँकेतून सेवानिवृत्त झाल्यावर काजरेकर यांनी आंबा व काजू बागायतीची आवड जोपासत असताना आपले हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान खूपच लांब व रुंद असल्याचे आढळले. त्या पानाची लांबी व रुंदी त्यांनी मोजली गुगलच्या साह्याने जागतिक रेकॉर्ड पडताळून पाहिले. निरीक्षणानंतर त्यांना आढळले की हे जगातील रेकॉर्ड होऊ शकते. या वैशिष्ट्यपूर्ण पानाला जागतिक रेकॉर्डच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नेण्यासाठी त्यांनी आपल्या मुली डॉ. नालंदा व डॉ. नुपूर तसेच जावई धीरज व डॉ. देवेंन यांच्या मदतीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स वर्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी रिपोर्ट पाठवला. त्यानंतर पुनर्रतपासणीचे रेकॉर्ड तयार करताना संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉक्टर विलास झोडगे यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या टीमची मदत मिळाली.या पानाची लांबी 55.6 सेमी व रुंदी 15.6 सेमी आहे. यापूर्वी प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्या शेती बागायती नवनवीन प्रयोग केले.