दोडामार्ग, दि. २५ मार्च
झरेबांबर चाळोबा देवस्थान येथे स्थायिक झालेल्या पाटये गावातील धरणग्रस्त यांनी आपल्या पारंपरिक शिमगोत्सव होळी रंगपंचमी धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा केली. यावेळी ढोलताशांच्या गजरात रंगाची उधळण करत नृत्य सादर केले. अनेकांच्या घरी जाऊन रंगाची उधळण केली. शिवाय यावर्षी एक नवीन आदर्श घालून घेतला रस्त्यावर वाहने अडवून पैसे मागणे योग्य नसल्याने यावेळी वाहने अडवली नाही. असा आदर्श इतरांनी घेणे आवश्यक आहे.