दोडामार्ग, दि. २५ मार्च
दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात रविवारी मोठ्या उत्साहात वार्षिक पारंपारिक शिमगोत्सवास सुरूवात झाली. होळी पौर्णिमा पासून सुरूवात झाली अनेक गावातील मंदिर चव्हाट्यावर होळ्या उभ्या केल्या. ढोल ताशांच्या गजरात सुरूवात केली, सोमवारी धूलिवंदन रंगपंचमी देखील ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. दोडामार्ग शहरात देखील युवक युवती महिला यांनी एकमेकांना रंग लावून होळी साजरी केली.
दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात पाच दिवस, सात, दिवस, नऊ दिवस, पंधरा दिवस शिमगोत्सव साजरा केला जातो. दोडामार्ग तालुक्यातील साटेली येथे सहाव्या दिवशी घोडेमोडणी हा पारंपरिक उत्सव प्रसिद्ध आहे. तसेच वझरे येथे गाडा उत्सव रथ ओढणे, झोळंबे येथे डोक्यावर कळस घेऊन धावणे, हेवाळे, येथील वाघखेळ, हे प्रसिद्ध आहे. हजारो लोक गर्दी करतात.