शिमगोत्सवास गावी आलेल्या चाकरमानी महिलेला दोडामार्ग येथे फटका

 गाडीवर ठेवलेली पर्स लांबवली पाऊणे तीन लाखांचे दागिने गेले चोरीला

दोडामार्ग, दि. २५ मार्च 

दोडामार्ग शहरात रविवारी आठवडा बाजारात भुरट्या चोरीच्या घटना या अगोदर देखील घडल्या असताना पुणे येथून मांगेली या आपल्या गावी शिमगोत्सवास आलेल्या महिला चाकरमानी दोडामार्ग बाजारपेठ मध्ये सामान खरेदी करण्यासाठी गेल्या असता गाडीत ठेवलेली दागिन्यांची अमेरिकन टुरिस पर्स चोरून नेली. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे खळबळ उडाली आहे. पाऊणे तीन लाखांचे दागिने चोरीला गेले आहेत. या चोरी बाबत दोडामार्ग पोलिस ठाण्यात रसिका सुरज गवस हिने फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली. अधिक तपास प्रसादी करत आहेत.