दोडामार्ग, दि. २५ मार्च
शिमगोत्सव काळात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू वाहतूक केली जाते. पण लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर महाराष्ट्र , गोवा, कर्नाटक, सीमेवर चेकपोस्ट उभारणी केली आहे. प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते. तरी देखील चोरटी दारू वाहतूक करणारे नवीन वाटा शोधत असतात अशाच प्रकारे चोरीटी दाऊ वाहतूक करत असताना विर्डी चेकपोस्ट येथे एका वाहनांची तपासणी केली असता ३० हजार गोवा बनावटीची दारू तसेच वाहन मिळून चार लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांवर गुन्हा दाखल केला. तर एक जण फरार झाला.
अर्जुन अशोक बांदिवडेकर यांनी फिर्याद दिली.