लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाकडून जिल्ह्यातून अरविंद मोंडकर इच्छुक-अध्यक्ष इर्शाद शेख

सावंतवाडी,दि.१५ जानेवारी
लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाने इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अरविंद मोंडकर इच्छुक आहेत. त्यांचा अर्ज पक्षाकडे पाठविला आहे अशी माहिती जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली. यावेळी जेष्ठ नेते विकास सावंत, सचिन वंजारी, अँड राघवेंद्र नार्वेकर उपस्थित होते.