मेशांच्या जुलूमशाहीचा नायनाट करून मिळवलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो गाडा उत्सव
दोडामार्ग, दि. २६ मार्च
दोडामार्ग तालुक्यातील वझरे गावचा गाडा उत्सव (रथोत्सव) हा जिल्ह्याबरोबर गोवा, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध आहे. होळीच्या तिसऱ्या दिवशी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मेशांच्या जुलूमशाहीचा नायनाट करून मिळवलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून म्हणून हा रथोत्सव साजरा केला जातो. साधारण दोनशे वर्षाची परंपरा या उत्सवाला लाभली असून यंदा हा उत्सव मंगळवारी मोठ्या उत्साहात हजारो नागरीकांच्या उपस्थित पार पडला. हा उत्सव सुरू करण्यापूर्वी ग्रामदेवता श्री देवी केळबाय सातेरी इतर देवताना गाऱ्हाणे घालण्यात आले. या नंतर ढोलताशांच्या गजरात देवाचा कळस रथाच्या ठिकाणी नेऊन रथाची मानकरी यांच्या हस्ते विधीवत पूजा केली या नंतर सजवलेल्या रथावर ठरल्याप्रमाणे गावातील मानकरी विराजमान झाले नंतर शेकडो युवकांनी दोरखंड बांधलेल्या रथ ओढणे गाडा उत्सव सुरू झाला. हा गाडा उत्सव पाहाण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती.