सावंतवाडी दि.२६ मार्च
जिल्ह्यात होऊ घातलेल्या नियोजित तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग या संस्थेला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयाकडून बँक खाते उघडण्यास व सभासद गोळा करण्यास परवानगी दिलेली असून या संदर्भात पुढील कार्यवाही करणे व केलेल्या प्रगतीची माहिती सर्व सभासदांना व बौध्द बांधवाना देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बौद्ध समविचारी कार्यकर्त्यांची सहविचार सभा शुक्रवार दि .२९ मार्च रोजी सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्ग ओरोस येथे आयोजित करण्यात आली आहे.
या संदर्भात पतसंस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दि.२६ ऑगस्ट २३ रोजी जिल्ह्यातील तमाम बौद्ध बांधवांची संयुक्त सभा घेण्यात आलेली होती या सभेला समाजाचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यावेळी समाजाची एक पतसंस्था निर्माण करण्यात यावी व त्याची सर्वस्वी जबाबदारी सेवानिवृत्त बौद्ध संघटनेने घ्यावी असा एकमुखी ठराव घेण्यात आला.
सहकार खात्याने काही अटी व शर्ती सह आवश्यक ते शेअर्स व अनामात रक्कम गोळा करणे याबाबत सूचना दिलेल्या आहेत. हा सर्व तपशील समाज बांधवांना व सभासदांना देण्यासाठी ही महत्त्वाची सभा बोलावलेली असून बौद्ध बांधवांनी आपली सामाजिक बांधिलकी ओळखून शुक्रवारी २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता, सामाजिक न्यायभवन सिंधुदुर्ग ओरोस येथे सर्व बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघाचे अध्यक्ष सूर्यकांत कदम व नियोजित तथागत नागरिक सहकारी पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक अरविंद वळंजू यांनी केले आहे.