वैयक्तिक मालमत्ता विक्री अगर हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश
सिंधुदुर्ग दि .२६ मार्च(भगवान लोके)
सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना मर्यादित सिंधुदुर्ग पडवे, माजगाव तालुका-दोडामार्ग या कारखान्याला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने काजू बी खरेदी व प्रक्रियेसाठी रु. एक कोटी एवढे कर्ज दिले होते. सदरचे कर्ज थकीत झाल्याने बँकेने संस्थेवर महाराष्ट्र सहकार कायदा कलम ९१ नुसार दि.२८ डिसेंबर २०२३ रोजी सहकार न्यायालय क्रं. २ कोल्हापूर येथे बँक कर्ज वसुलीसाठी दावा दाखल केला होता. या दाव्या पोटी न्यायालयाने दिनांक २६ मार्च २०२४ रोजी अंतरिम आदेश निर्गमित केला असून संस्थेची मालमत्ता तसेच संस्था अध्यक्ष चंद्रशेखर अर्जुन देसाई व अन्य संचालक यांच्या नावे असलेली वैयक्तिक मालमत्ता विक्री अगर हस्तांतरण करण्यास प्रतिबंध केलेला आहे. या कामी बँकेच्या वतीने अँड. अमोल पाटील,कोल्हापूर यांनी कामकाज केलेले आहे.