कणकवली तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने संतोष कांबळे यांचा सत्कार

कणकवली दि.१५ जानेवारी(भगवान लोके)

तालुका फोटोग्राफर असोसिएशन तालुका कणकवली च्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग आरेखख पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल ज्येष्ठ छायाचित्रकार संतोष कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष विनायक पारधीये, उपाध्यक्ष कृष्णा कांबळी ,सचिव सुरजीत ढवण, खजिनदार विनोद दळवी, संजय काणेकर, संजय राणे, संजोग सावंत व इतर फोटोग्राफर असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते .