आचरा,दि.२५ मार्च(अर्जुन बापर्डेकर)
आचरा पिरावाडी येथे २७ मार्च संत तुकाराम बिज
पासून शिमगोत्सवाला सुरुवात होत आहे.2 मार्च पर्यंत सात दिवस चालणारया या शिमगोत्सवात
ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात
बुधवार २७ रोजी पहाटे पासूनच घुडघूडा वादनाने या शिमगोत्सवाला सुरुवात होते.सायंकाळी ठिक ४ वाजता मांड उभा केला जातो. यानंतर घुमट वादनासोबत श्री देव चव्हाटा रामेश्वर भेटीसाठी रवाना होतो.गाउडवाडी.ब्राम्हणदेव होळी भेट देत रामेश्वर मंदिर होळदेव देवूळवाडी येथे भेट दिली जात.यानंतर,श्री देव रामेश्वर मंदिर देवूळवाडी ,श्री रवळनाथ मंदिर देवूळवाडी ,आचरा ग्रामोपाध्याय श्री निलेश सरजोशी यांचे घरी व नंतर म्हारकीचाळा भंडारवाडी येथे भेट देत रात्री ८.३० वाजता श्री देव चव्हाटा येथे आगमन होते.
रात्री ९.३०वाजता श्री राधाकृष्ण मंदिर देवस्थान आचरा पिरावाडी यांचे सुश्राव्य घुमट वादन होणार आहे यानंतर रात्री १०.३० वाजता .
महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग प्रतिकृष्ण सादर होणार आहे.
दि .२८मार्च रोजी
सायं पाच वाजता फनिगेम चे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर
बक्षीस वितरण व मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री ९.३०वाजता श्री विठ्ठल समाज विकास मंडळ उत्तरवाडा यांचे घुमट वादन होणार आहे.रात्री १०.३०वाजता महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग दैवयोग सादर होणार आहे.दि . २९मार्च रोजी
सायं पाच वाजता तीच्यासाठी सारे काही. खेळ जगप्रसिद्ध येवला पैठणीचा खेळला जाणार आहे
रात्री ९.३०वाजता श्री तरुण संघ दक्षिणवाडा यांचे घुमट वादन होणारआहे.रात्री १०.३० वाजता .
गोफनृत्याचा कलाविष्कार सादर होणार आहे.दि . 30 मार्च रोजी सकाळी ठिक १० ते १ व दुपारी ३.३० ते ७ गावमागणी कार्यक्रम होणार आहे.
रात्री ९.३०वाजता मधलावाडा ग्रामस्थसभा आचरा पिरावाडी यांचे घुमट वादन होणार आहे.रात्री १०.३० वाजता भव्य जिल्हास्तरिय समूह व एकेरी नृत्य स्पर्धा होणार आहे. दि . ३१ रोजी सकाळी१०ते१ व दुपारी ३.३०ते७.३० गावमागणी कार्यक्रम होणार आहे.रात्री ९.३०वाजता सर्व ग्रामस्थांचे एकत्रीत सुश्रांव्य घुमट वादन होणार आहे.
रात्री ११ वाजता ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडीचे दोन अंकी सामाजिक व जिव्हाळ्याचे नाटक .”जन्मदाता” सादर होणार आहे.
रात्री 12:00 वाजता पचिक घालणे कार्यक्रम होणार आहे.
दि .१एप्रिल रोजी पहाटे 5:00 वाजता . घुमट , भुपाळी , आरती ७ वाजता गुलाल उधळणे (धुळवड) होणार आहे.
दि . २मार्च रोजी दुपारी 12:30 वाजता महाप्रसादाने या होळी उत्सवाची सांगता होणार आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.