दोडामार्ग तालुक्यात चांदा ते बांदा विकास योजना अंतर्गत दिलेल्या शेळ्या मृत्यूमुखी

आजारी रोगयुक्त शेळ्या दोडामार्ग पंचायत समिती समोर बांधण्याचा दिला इशारा

दोडामार्ग,दि.२५ मार्च

दोडामार्ग तालुक्यात चांदा ते बांदा विकास योजना अंतर्गत दिलेल्या शेळ्या मृत्यूमुखी शेळ्यांना झालेल्या आजाराची इतर पाठीव शेळ्यांना लागण धनगर समाज संकटात तीन हजार रुपये खरेदी करून आठ हजार रुपये किंमत लावून आजार रोगयुक्त शेळ्या पुरवठा केला संबंधित अधिकारी यांच्या विरोधात संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे यासाठी बुधवारी पुरवलेल्या आजारी रोगयुक्त शेळ्या दोडामार्ग पंचायत समिती समोर बांधण्याचा दिला इशारा
दोडामार्ग तालुक्यातील ३७ लाभार्थी यांनी चांदा ते बांदा विकास योजना अंतर्गत जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांच्याकडे अर्ज केले होते यातील काही लाभार्थी यांना दोडामार्ग पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग कडून सावंतवाडी येथे एका कार्यक्रमात शेळ्या दिल्या होत्या अवघ्या आठ दिवसात त्या आजारी रोगयुक्त आढळून आल्या दहा शेळ्या एक बकरा असे वितरण काही शेळ्या मृत्यू पावल्या शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी धनगर बांधवाच्या गोठ्यात जाऊन मृत्यू झालेल्या आजारी रोगयुक्त शेळ्या केली पाहणी संबंधित अधिकारी यांना धरले धारेवर आजारी रोगयुक्त शेळ्या दोडामार्ग पंचायत समिती कार्यालय येथे बुधवारी बांधण्याचा दिला इशारा संबंधित अधिकारी यांचे धाबे दणाणले या शेळ्या मुळे पाळीव बकऱ्यांना लागण. झाली आहे. संबंधित अधिकारी यांनी तेरा हजार रुपये विम्याची रक्कम भरुन घेतली पण भरपाई दिली जाणार नाही असा पविञा घेऊन घेतला आहे. पुरवठा शेळ्या बकऱ्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाही तर लांब कानाच्या बकऱ्या पुरवल्या या इकडे आढळून येत नाही असा आरोप केला आहे. चांदा ते बांदा विकास योजना अंतर्गत पशुसंवर्धन विभाग कडून शेळ्या पुरवठा मध्ये मोठा घोटाळा झाला आहे.