सातरल येथे आज शिवजन्मोत्सव कार्यक्रम

कणकवली दि.२६ मार्च(भगवान लोके)

सुहास राणे मित्रमंडळातर्फे गुरुवार २८ मार्चला सातरल-खालचीवाडी येथील छत्रपती महाराणा प्रताप चौकात शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ९ वाजल्या पासून शिवप्रतिमेचे पूजन, श्री सत्यनारायण पूजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, १ वाजता महाप्रसाद, ३ वाजता हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी पैठणी स्पर्धा, रात्री ८ वाजता भजने होतील. या उत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.