जिल्ह्यात राज्य क्रीडा दिन ज्युदो व कुस्ती स्पर्धांनी साजरा : कासार्डे विद्यालयातील ७०० विद्यार्थ्यांच्या मानवी आकृतीतून राज्य क्रीडा दिन’

सिंधुदुर्गनगरीत खेळाडूंचा सत्कार व एनसीसी कॅडेटची रॅली

तळेरे,दि.१५ जानेवारी

ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव यांचा १५ जानेवारी हा जन्मदिवस आज राज्यभर महाराष्ट्र ‘राज्य क्रीडा दिन म्हणून विविध मैदानी तसेच खेळांच्या प्रात्यक्षिके व स्पर्धानी साजरा आला.
जिल्ह्यात क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या मार्गदर्शनानुसार कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयात मैदानावर ५० बाय ६० मीटरची मानवीकृतीतून ‘राज्य क्रीडा दिन’ २०२४’अक्षरे तयार करून तसेच ज्युदो आणि कुस्ती स्पर्धेचे आयोजन करुन हा पहिलाच ‘राज्य क्रीडा दिन ‘मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे व प्र.मुख्याध्यापक एन.सी. कुचेकर यांच्या हस्ते ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले
त्यानंतर विद्यालयात कुस्ती व ज्युदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मुख्याध्यापक एन.सी.कुचेकर यांनी खाशाबा जाधव यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत त्यांचा संपूर्ण जीवनपट विद्यार्थ्यांसमोर कथन केला.
या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, उपसचिव आनंद कासार्डेकर, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर,प्र.
मुख्याध्यापक एन.सी.कुचेकर, जेष्ठ शिक्षिका सौ.बी.बी.बिसुरे, विद्यालयचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, सहाय्यक शिक्षक अनंत काणेकर, सौ.पेडणेकर व कला शिक्षक सागर पांचाळ यांच्या उपस्थित विजेत्या खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी केले.
दुपारच्या सत्रात विद्यालयातील सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कला शिक्षक सागर पांचाळ आणि क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड तसेच इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कासार्डे विद्यालयच्या भव्य पटांगणावर ६० बाय ५० मीटर जागेत मानवी आकृतीतून ‘राज्य क्रीडा दिन – २०२४ ‘ ही अक्षरे तयार करून ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांना अभिवादन केले.

सिंधुदुर्गनगरी राष्ट्रीय व राज्य खेळाडूंच्या सत्काराचे राज्य क्रीडा दिन साजरा..

सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग व 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राज्य क्रीडा दिन’ राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंचा सत्कार तसेच रॅली , परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करून पहिला राज्य क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, एनसीसीचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाभरात अनेक शाळांत ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.