व्हरेनिअम क्लाऊड कंपनीच्या प्रधान कार्यालयाचे हर्षवर्धन साबळे यांच्या हस्ते सावंतवाडीत उद्घाटन अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार

सावंतवाडी,दि.१५ जानेवारी
व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेड या जागतिक दर्जाच्या कंपनीच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन सावंतवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थीतीत झालें. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मध्ये स्थापन झालेल्या व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेडच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेडचे संचालक हर्षवर्धन साबळे यांनी कोकणवासीयांच्या प्रेमा खातर कोकणातील तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम राबविले आहेत. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर गणेश पूजन करून उद्घाटन करण्यात आले.

या कंपनीच्या माध्यमातून आणखी दोनशे जणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. 12 फेब्रुवारी 2018 मध्ये हर्षवर्धन साबळे यांच्या माध्यमातून कोकणातील या उपक्रमाची सुरुवात झाली होती. कोकणवासियांसाठी काहीतरी करावं ही साबळे यांची इच्छा होती. या उद्देशानेच त्यांनी मुंबईसारख्या मायानगरीतून सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण भागात नेटवर्क उभा करण्याचा मानस तयार केला होता. या त्यांच्या प्रयत्नांना आज खर्‍या अर्थानं यश मिळालं आहे. कोकणात अनेक तरुणांना यापुढ रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. सध्या बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी मुंबई किंवा पुणे गाठावं लागतंय. मात्र यावर उपाय म्हणून कोकणात डिजिटल तंत्रज्ञान उभं करण्याचा मनोदय कंपनीने व्यक्त केला आहे. या नवीन प्रधान कार्यालयाच्या माध्यमातून अनेक नोकर्‍या उपलब्ध होणार आहेत. व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड प्रधान कार्यालया च्या उदघाटन सोहळ्यास मनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे, हायड्रा ओपरेशन हेड-अनुष्का लोध, टेक्निकल कन्सलटंट-मुकुंदन राघवन, सावंतवाडी हेड-विनायक जाधव, अडमीन-संदिप नाटलेकर, प्रोजेक्ट इंजिनियर -लक्ष्मण नाईक, सतीश पाटणकर, साहील नाईक,ओंकार सावंत व कर्मचारीवृंद उपस्थित होते.