सातार्डा उत्तम स्टील परिसरात अग्नि प्रलय

सावंतवाडी दि.२९ मार्च 
सातार्डा येथील उत्तमस्टील परिसरात भर दुपारी लागलेल्या आगीत काजू व इतर जंगली झाडे जळून खाक झाली आहेत. हा वणवा १५ ते २० एकरात पसरला आहे. भरदुपारी वारा असल्याने आग झपाट्याने पसरत गेली. पुढे पेळपीवाडी असून त्याठिकाणी आंबा, फणस, काजू व इतर बागायती असल्याने तेथील लोकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान याबीकडे उत्तमस्टील कंपनीचेही लक्ष नसून प्रशासनाचेही लक्ष नाही त्यामुळे परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.