कणकवली येथील कोरल सोसायटी ओपन जिमचे उद्घाटन संपन्न

आचरा,दि.१५ जानेवारी(अर्जुन बापर्डेकर)
सोसायटीच्या मुलांना खेळाबरोबरच व्यायामाचीही आवड निर्माण व्हावी, जेष्ठ नागरिकही शारीरिक तंदुरुस्त रहावेत आणि सोसायटी सदस्यांचे आरोग्य उत्तम रहावे या उद्दात हेतूने सोसायटीचे बिल्डर रविकांत सावंत यांनी स्वखर्चाने उभारलेल्या ओपन जिमचे उद्घाटन सोसायटी सदस्य आणि तोंडवळी कालेजचे प्राचार्य विनायक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सोसायटीचे सदस्य
दत्ता डेगवेकर, दत्ताराम जाधव,रामकृष्ण शिरवलकर,सौ शुभांगी शिरवलकर,रमेश पेडणेकर, उदय करंबेळकर, अर्जुन बापर्डेकर,प्रशांत राणे,सौ सविता डेगवेकर,सौ सुवर्णा जाधव,उदय दळवी, राम घाडी,डाँ संदीप पाचकूडे,यश राणे,सुधाकर मेस्त्री,सौ सांची घाडी,सौ सुनीता बापर्डेकर,,सौ अक्षता राणे,सौ प्रिया पाचकूडे, पूणम मेस्त्री,छोटी मुले गौरी मुणगेकर, वृद्धी घाडी,वेदान्त बापर्डेकर, प्रेम पाचकुडे,दक्ष पाचकूडे,परी कडकोळ,प्रेम कडकोळ यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.यावेळी अर्जुन बापर्डेकर यांनी कोरल सोसायटीचे बिल्डर रविकांत सावंत यांनी उदात्त हेतूने सोसायटी सदस्यांसाठी अनेक प्रकारची व्यायामाच्या दृष्टीने साधने ओपन जिममधून उभारल्या बद्दल धन्यवाद व्यक्त केले.