Ram Mandir : रामलल्लाचा भव्य प्रतिष्ठापना सोहळा; घराघरांत आमंत्रण, …

माजी आम. कै.आप्पासाहेब गोगटे यांचे सुपुत्र प्रकाश (बंड्या) गोगटे सहपत्नीक घरोघरी जात श्री राम लल्लाच्या दर्शनासाठी या असे आग्रहाचे निमंत्रण

देवगड,दि.१५ जानेवारी (गणेश आचरेकर)

अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. त्यानिमित्त गृहसंपर्क अभियान राबवण्यात येतंय. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने घरोघरी अक्षता आणि मंदिराचे फोटो पाठवून 23 जानेवारीपासून श्री रामाच्या दर्शनासाठी या असं आग्रहाचं निमंत्रण पाठवलं जाते आहे. यावेळी माजी आमदार कै. आप्पासाहेब गोगटे यांचे सुपुत्र प्रकाश (बंड्या) गोगटे सहपत्नीक जामसंडे परिसरात घरोघरी जात श्री राम लल्लाच्या दर्शनासाठी या असे आग्रहाचे निमंत्रण दिले.

अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा अनुषंगाने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्या वतीने सामान्य नागरिकांच्या घरी अक्षदा आणि मंदिराचं फोटो पाठवून 23 जानेवारीपासून श्री रामाच्या दर्शनासाठी या असे आग्रहाचे निमंत्रण दिले जात आहे. मात्र, आता कार्यकर्त्यांचा उत्साह आणि लोकांची राममय भावना लक्षात घेता 1 कोटीपेक्षा जास्त कुटुंबापर्यंत हे निमंत्रण जाईल अशी स्थिती आहे. श्रीरामाच्या मंदिरासाठी लोकांच्या भावना अप्रतिम आहे, आम्हाला ही कधी नव्हे असे अनुभव येत आहे. त्यामुळे आमचे कार्यकर्ते उत्साहाने अक्षदा पोहोचवून श्रीरामाच्या दर्शनासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती बंड्या गोगटे यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्या समावेत माजी नगरसेवक राजेंद्र वालकर, पूजा गोगटे, शिल्पा गोगटे, मिलिंद ठाकूर, चंदन घाडी,धीरज बाणे आदी रामभक्त उपस्थित होते.यावेळी अन्य ग्रामीण भागात देखील प्रत्येक रामभक्त घराघरात जाऊन श्री राम लल्ला च्या दर्शनासाठी यावे असे आग्रहाचे निमंत्रण अक्षदा व मंदिराचा फोटो देऊन प्रत्येक राम भक्ताला विनंती केली जात आहे यामुळे राम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण प्रत्येक गावागावात पहावयास मिळत आहे