मालवण,दि.१५ जानेवारी
अयोध्येतील श्री राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या संकल्पनेतून चिंदर येथील रामेश्वर मंदिर येथे दि. २२ जानेवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यानिमित्त सकाळी ८ वा. देव रामेश्वर जा व अभिषेक, ९ वा. श्री राम महापूजा व अभिषेक, १० ते १२ वा. होमहवन व रामनाम जप, दुपारी १२ वा. नैवेद्य व अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा थेट प्रक्षेपण, १.३० वाजता महाप्रसाद, ३ वा. गावातील विविध भजन मंडळांची भजने, रात्री ८ वा. प्रथमच श्रीराम गीतांवर जिल्हास्तरीय खुली एकेरी, दुहेरी, तिहेरी व समूहनृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार, ५ हजार रुपये व प्रत्येकी चषक तसेच उत्तेजनार्थ दोघांना प्रत्येकी २ हजार रुपये व प्रत्येकी चषक देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दीपक सुर्वे (८४०८०९०१५१), संतोष गावकर, विजय उर्फ (बाबू) कदम यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन चिंदर ग्रामस्थ, बारापाच मानकरी आणि रामभक्तांनी केले आहे.