भाजपा आ.नितेश राणेंनी अजयकुमार सर्वगोड यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा..

कणकवली दि.३१ मार्च(भगवान लोके)

सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा आमदार नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी श्री. सर्वगोड यांनी भेट घेतली.यावेळी चिरंजीव अक्षय सर्वगोड उपस्थित होते.आ.राणे यांनी श्री.सर्वगोड यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची तळमळ असणारा अधिकारी असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली.