कणकवली दि.१ एप्रिल (भगवान लोके)
नांदगाव सरपंच रविराज मोरजकर व त्यांचा भाऊ भूपेंद्र मोरजकर यांना मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी सुरेश अर्जुन मोरये(६२) व कमलेश सुरेश मोरये (३९, दोघेही रा. नांदगाव तिठा) यांना अटक करून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्याने आरोपींना कणकवली न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मागितले असून यावर पुढील सुनावणी उद्या होणार आहे.या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करीत आहेत.