खास. विनायक राऊत ३ एप्रिल रोजी मालवण दौऱ्यावर

मालवण,दि.२ एप्रिल

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते श्री. विनायक राऊत हे बुधवार दि. ३ एप्रिल रोजी मालवण तालुका दौरा करणार आहेत.

यामध्ये सकाळी १० वा. सुकळवाड सकाळी १०.३० वा. तिरवडे, सकाळी ११.३० वा. पेंडुर, दुपारी १२ वा. चाफेखोल, दुपारी १ वा. नांदरुख, दुपारी ३ वा. तारकर्ली, सायंकाळी ४ वा. सर्जेकोट, सायंकाळी ५ वा. तोंडवळी, सायंकाळी ६ वा. चिंदर, सायंकाळी ७ वा. मठबुद्रुक, रात्रौ ९ वा. वडाचापाट येथे खास. विनायक राऊत हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे.