मालवण गवंडीवाडा येथे ७ रोजी रक्तदान शिबीर

 मालवण,दि.२ एप्रिल

मालवण गवंडीवाडा येथील श्री राम मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त रविवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.