स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाला देवगडात उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने “स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपट प्रेक्षकांना मोफत

देवगड,दि.२ एप्रिल
राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने “स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपट प्रेक्षकांना मोफत दाखविण्यात येत असून. मंगळवार दिनांक २ एप्रिल रोजी राष्ट्रीय संस्कार मंडळ देवगड चे अध्यक्ष विद्याधर माळगावकर सचिव महेश
कानेटकर इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.या प्रसंगी ऍड अजित गोगटे, स्टार लाईट सिनेमा संचालिका तन्वी चांदोस्कर, योगेश चांदोसकर, शरद ठुकरुल, दयानंद पाटील,संतोष किंजवडेकर,यश रानडे व अन्य उपस्थित होते.व बुधवार दिनांक ३ एप्रिल रोजी दुपारी ठीक १२ वाजता हा चित्रपट युवा वर्ग रसिक यांच्याकरिता स्टार लाईट चित्रपटगृह देवगड येथे मोफत शो प्रेक्षकांना दाखविण्यात येणार आहे. तसेच युवा वर्गाचा वाढता प्रतिसाद पाहता बुधवार दि ४ एप्रिल दु.३ वा. दि.५ एप्रिल साय ६ वा.दि .६ एप्रिल शनिवारी रा.९ वा.मोफत दाखविण्यात येणार आहे.मोफत बुकिंग संपर्कासाठी ९४२३३०३६९२/७४४८२७८७८५/९७६६९५३६६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.