सावंतवाडी दि.२ एप्रिल
सिंधुदुर्ग डाक सेवक संघटना अध्यक्ष पदी श्री संतोष विष्णू हरिह्यान तर सचिव पदी श्री तुकाराम बाळकृष्ण गावडे भरघोस मतांनी विजयी झाले.
सिंधुदुर्ग डाक सेवक संघटनेच्या अध्यक्ष आणि सचिव चुरशी च्या अटीतटीच्या लढतीत शेवटच्या क्षणात पर्यंत लांबलेली निवडूनकित संघटनेच्या विद्यमान अध्यक्ष श्री संतोष विष्णू हरिह्यान भरघोस मतांनी विजयी झाले आणि श्री जे एम मोडक ह्यांचा पराभव झाला तसेच संघटनेचे विधमान सचिव श्री तुकाराम गावडे हे चुरशी च्या लढाईत बहुमतांनी विजयी झाले कु. अंकित चव्हाण हे पराभूत झाले .सर्वांनी दाखवलेला अतूट विश्वास मुळे हे शक्य झाले . परत एकदा विश्वास हीच आमच्या कामाची पोच पावती दिली आहे असे नव नियुक्त सचिव श्री तुकाराम गावडे यांनी म्हटले आहे.