रेल्‍वे तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणातील संशयित आरोपीला जामीन

कणकवली दि.२ एप्रिल (भगवान लोके)

कणकवली ,बांधकरवाडी येथील मुकुंद शिवाजी सातवसे (३०)या संशयिताला रेल्‍वे तिकीटांचा काळाबाजार केल्‍याप्रकरणी रेल्‍वे सुरक्षा बलाने सोमवारी ताब्‍यात घेतले होते.त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.
मुकुंद सातवसे या संशयिताने आयआरसीटीसी ॲपवरून रेल्‍वेची मर्यादेपेक्षा अधिक तिकीटे काढून ग्राहकांना विक्री केली होती. याबाबत आयआरसीटीसीकडून रेल्‍वे पोलिसांना कळविण्यात आले. त्‍यानंतर रेल्‍वे तिकीटे काढून देणाऱ्या त्या तरूणाची माहिती घेऊन त्‍याला रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राजेश सुरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेण्यात आले होते.मंगळवारी त्याला कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.