कोल्हापूर येथील विज्ञान प्रदर्शनात सुयश
मालवण,दि.२ एप्रिल
कोल्हापूर येथील संजय घोडावत इन्स्टिट्युट येथे आयोजित इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून मालवण तालुक्यातील रामगड येथील प्रगत विद्यामंदिर या प्रशालेच्या कु.साक्षी रविंद्र जिकमडे व कु.ओमतेज उल्हास तारी या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विज्ञान प्रतिकृतीची निवड राज्यस्तरावर झाली आहे.
सदर विज्ञान प्रदर्शन हे भारत सरकारच्या केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नॅशनल इनोवेशन फाउंडेशन, अहमदाबाद, महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर. कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी माध्यमिक शिक्षण विभाग, कोल्हापूर विज्ञान शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये तीन जिल्ह्यातील एकूण १६२ विज्ञान प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. त्यापैकी १५ विज्ञान प्रतिकृतीची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली. यामध्ये त्यामध्ये रामगड येथील प्रगत विद्यामंदिर च्या .साक्षी रविंद्र जिकमडे व कु.ओमतेज उल्हास तारी या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या प्रतिकृतीची निवड राज्यस्तरासाठी झाली आहे.
या विज्ञान प्रतिकृतीसाठी प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री. एम. पी. पवार तसेच प्रयोग शाळा परिचर श्री. विजय लिंगायत यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या प्रशालेचे विदयार्थी कुमारी. साक्षी रवींद्र जिकमडे व कुमार. ओमतेज उल्हास तारी यांचे कडून उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. या सर्वांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री.वा.स.प्रभुदेसाई,उपाध्यक्ष श्री.सुभाष तळवडेकर, सचिव श्री.बाळ मटकर संचालक सुभाष धुरी श्री. सदानंद वाघ,श्री.विजय कुवळेकर ,श्री. अभय देसाई,श्री. नरेंद्र हाटले श्री. रामचंद्र कामतेकर,श्री. ज्ञानदेव जाधव,श्री.रा. दि. घाडीगावकर,श्री. तातोबा घाडीगावकर,श्री.नरीहर परुळेकर ,श्री. घनश्याम चव्हाण,श्री. मोहन घाडीगावकर व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. ए. एम. वळंजू, सर्वं शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले.